केंद्राकडून निधीच आलेला नाही; महाविकास आघाडीचे प्रत्युत्तर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-कोरोनाच्या संकटाच्या काळात मदतीवरून रकजीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती दिली.

परंतु आता सत्ताधाऱ्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही स्वतंत्र निधी आला नाही फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.

फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

त्याशिवाय जयंत पाटील यांनी आर्थिक तरतुदीचे बारकावे नमूद केले आणि बाळासाहेब थोरात यांनी आमचे सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा कोरोनाचा सामना करण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे.

मात्र, लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर मांडतोय, असे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

अनिल परब म्हणाले की, विरोधीपक्षाने उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणून दिली असती, तर आम्ही अभिनंदन केले असते. फडणवीसांच्या दाव्याप्रमाणे १७५० कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही.

१२२ कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिलेले नाहीत, कारण ऑर्डर चार दिवसापूर्वी निघाली आणि मजूर आधीच गावी पोहोचलेले आहेत. विधवा, दिव्यांग आणि इतरांना ११६ कोटी दिले असा दावा फडणवीसांनी केला.

पण या योजनेत फक्त २० टक्के रक्कम केंद्र सरकार देते. महाराष्ट्र सरकारने उर्वरित ८० टक्के म्हणजे १२१० कोटी दिले, हे त्यांनी सोयीस्करपणे सांगितले नाही.

महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारने दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतलेले नाहीत.

श्रमिकांना ट्रेनने सोडण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारने केला. मजुरांकडून एकही पैसा घेतला नाही. तसेच एका ट्रेनला ५० लाख खर्च कुठून येतो, याचा हिशोब विरोधीपक्षकडून घ्या, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment