अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
परंतु, काही निर्बंध लावले जातील, असेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्ताने दापोलीत आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, दिवाळीमध्ये रुग्ण तपासणीचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved