अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे.
त्यांची प्रकती स्थिर व चांगली आहे. सदर रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्षणे आढळून आली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
तथापि नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सध्या गावोगाव भरणाऱ्या यात्रा व उरुसाच्या पार्श्वभूमी वर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
काळजी करावयाचे किंवा घाबरण्याचे कुठलेही कारण नसून सर्व नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यांत येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com