पुण्यात ‘या’ ठिकाणी उभारला जाणार 53 किमीचा सहा पदरी उड्डाणपूल

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता आता राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून येरवडा ते शिरूर हा 53 किलोमीटरच्या अंतरा दरम्यान  सहा लेनचा उड्डाणपूल उभारण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.

Ajay Patil
Updated:

Pune News : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे तसेच नाशिक व इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये जर आपण बघितले तर वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.  तुम्हाला काही मिनिटांच्या अंतर पार करण्यासाठी देखील एक एक दोन दोन तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागतो.

जास्त करून ही परिस्थिती मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अगदी याच पद्धतीने जर आपण पुणे शहराच्या दृष्टिकोनातून बघितले तर पुणे शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरांमध्ये आता अनेक उड्डाणपूल तसेच रिंग रोडचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मिटावी याकरिता रिंग रोडचे काम हाती घेण्यात आलेले आहे. अगदी याचप्रमाणे जर आपण पुणे शहरातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या पाहिली तर ती देखील खूप बिकट स्वरूपात आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता आता राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून येरवडा ते शिरूर हा 53 किलोमीटरच्या अंतरा दरम्यान  सहा लेनचा उड्डाणपूल उभारण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.

 येरवडा ते शिरूर उड्डाणपुल उभारण्यास शासनाचे मान्यता

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मिटावी याकरिता राज्य शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून येरवडा ते शिरूर हा 53 किमी दरम्यान सहा लेनचा उड्डाणपूल करण्यासाठी मान्यता दिली आहे. उड्डाणपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार असून या उड्डाणपूल उभारणीला 7515 कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. नुकतेच काही दिवसांपूर्वी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मिटावी याकरिता येरवडा ते शिरूर हा रस्ता सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले होते.

तसेच नगर रस्ता हा राज्यमार्ग असल्यामुळे राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या सिग्नल विरहित पुणे ते मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्यात यावा व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

म्हणून येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहा पदरी करण्यासोबत कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेट सेपरेटर करायचे यासंबंधीचा आराखडा करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर सविस्तर प्रस्ताव तयार करून तो मान्यतेकरिता शासनाकडे पाठवण्यात आला होता

व त्याला आता गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला  मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच आता हा उड्डाणपूल उभारला गेल्यास नगरकडे येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीच्या समस्या पासून मुक्तता होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe