Pune Shopping Market : सगळ्यात स्वस्त शॉपिंग ! पहा पुण्यातील स्वस्तात मस्त शॉपिंग ठिकाणे

पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते.तसेच एक आयटी हब म्हणून देखील पूणे भारतात प्रसिद्ध आहे. अशाप्रसंगी पुण्यामध्ये स्वस्तात मस्त शॉपिंग करता येतील असे ठिकाणी देखील खूप आहेत. या ठिकाणांची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

Ajay Patil
Updated:
tulshibaug market

Pune Shopping Market : जेव्हाही आपण कुठे फिरायला बाहेर जातो किंवा एखाद्या पर्यटन स्थळी पर्यटनासाठी जातो तेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन नुसते पर्यटन स्थळे पाहणे किंवा ज्या कामासाठी बाहेर गेलो आहोत ते काम करून परत येत नाहीत. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काही का असेना थोडेफार प्रमाणात शॉपिंग करतो.

परंतु शॉपिंग करताना आपल्याला दुसऱ्या शहरांमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी स्वस्तात मस्त असलेली शॉपिंग सेंटर किंवा शॉपिंगची ठिकाणे माहिती नसतात. त्यामुळे महागाईत आपली इच्छा असून देखील आपण शॉपिंग करत नाहीत. अगदी याच पद्धतीने जर तुम्ही पुण्याला फिरायला गेलात आणि तुमची शॉपिंग करायची इच्छा झाली तर पुण्यामध्ये अशी काही ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही स्वस्तात मस्त शॉपिंग करू शकता.

पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते.तसेच एक आयटी हब म्हणून देखील पूणे भारतात प्रसिद्ध आहे. अशाप्रसंगी पुण्यामध्ये स्वस्तात मस्त शॉपिंग करता येतील असे ठिकाणी देखील खूप आहेत. या ठिकाणांची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 आहेत पुण्यातील स्वस्तात मस्त शॉपिंग करता येतील अशी ठिकाणे

1- फॅशन स्ट्रीट पुण्यातील हे एक महत्वपूर्ण ठिकाण असून तुम्ही जर कॅम्प परिसरामध्ये गेला तर फॅशन स्ट्रीट हे ठिकाण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला अनेक पारंपारिक आणि पाश्चिमात्य अशा सगळ्या वस्तू खरेदी करता येतात.

या ठिकाणी कुठलीही वस्तू तुम्ही 200 रुपयापासून खरेदी करू शकतात. तसेच फॅशन स्ट्रीट या ठिकाणी दुकानाचे पर्याय देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला अनेक वस्तूंचे बरेच पर्याय पाहायला मिळतात व तुम्ही बेस्ट पर्याय निवडू शकतात.

2- जुना बाजार पुण्यामध्ये ज्या काही पेठा आहेत त्यामध्ये मंगळवार पेठ आणि पुणे स्टेशनकडे जो रस्ता जातो त्यावर तुम्हाला जुना बाजार पाहायला मिळतो.

तुम्हाला जर अँटिक स्वरूपाच्या वस्तू खरेदी करण्याची किंवा त्यांचा संग्रह करण्याचा छंद असेल तर तुम्ही जुना बाजारामधून ते खरेदी करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला पितळेच्या देखील अनेक वस्तू खरेदी करता येतात.

3- हॉंगकॉंग लेन हॉंगकॉंग लेन हे देखील पुण्यातील एक महत्त्वाचे शॉपिंग करता येईल असे ठिकाण असून ते जे. एम. रोड या ठिकाणी आहे.

या ठिकाणी तुम्हाला फुटवेअर तसेच कपडे, अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तसेच मोबाईलचे कव्हर व हॅन्डबॅग सारख्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये मिळतात. पुण्यातील हे हॉंगकॉंग लेन हे ठिकाण कमी किमतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

4- तुळशीबाग मार्केट समजा तुम्ही या गणपतीमध्ये जर दगडूशेठ गणपतीचे दर्शनाला गेलात तर या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. तुळशीबाग मार्केट हे पुण्यातील अतिशय जुने मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे व या ठिकाणी तुम्ही कपड्यांपासून तर चपलांपर्यंत तसेच ज्वेलरी पासून तर घरगुती वस्तूपर्यंत खरेदी करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe