अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- रस्ते महार्गावर लुटमारीच्या घटना अद्यापही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे चोरटे वाहनचालकांना लुटताना दिसत आहे.
असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे. लघुशंकेसाठी थांबलेल्या मालट्रक चालकाला चाकूचा धाकू दाखवून 25 हजार रूपयाला लुटले.
नगर- औरंगाबाद रोडवरील गजराजनगर येथे भरदुपारी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी कि, ट्रक चालक तुकाराम महादेव झिरपे (वय- 38 रा. कोळगाव ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. झिरपे मालट्रक घेऊन नगर- औरंगाबाद रोडने चालले होते.
त्यांनी गजराजनगर येथे लघुशंकेसाठी मालट्रक उभा केला. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांमधील मध्ये बसलेल्या एकाने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखविला.
फिर्यादी यांच्या खिशातील 25 हजारांची रोख रक्कम काढून घेत पळ काढला. फिर्यादी यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved