अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : रविवारी थंडीने दोघांचा बळी गेल्याच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी एका अनोळखी इसामाचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अंदाजे ६० ते ६५ वर्षे वयोगटातील एक अनोळखी वृद्ध सदर हद्दीतील किंग्जवे हॉस्पिटलच्या मागे, मोहननगर, प्रार्थना लॉरेन यांच्या घरासमोर बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे भरती केले असता, २९ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….
हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….
हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून