‘देशातील तीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात तरी मंत्री म्हणतायेत सगळं आलबेल’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सर्वांत उत्तम कोरोना हाताळणी झाली असे म्हणत आहेत.

परंतु ‘देशातील तीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात तरी मंत्री म्हणतायेत सगळं आलबेल आहे असे कोणत्या आधारावर म्हणतायेत ते अद्याप कळाले नाही. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाविकास अघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी केंद्राने दिलेल्या मदतीचा आलेख सादर करत राज्य सरकारवर टीका केली.

फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘राज्यसरकारमधील तीन मंत्र्याची पत्रकारपरिषद म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल, असा प्रयत्न आहे. केवळ आभासी अशा घोषणा करायच्या आणि देशातील ३३ टक्के रूग्ण ज्या राज्यात आहेत, ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात आहेत,

त्या राज्याचे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आम्ही कसे उत्तम काम करतो आहोत हे सांगण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.

केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची, यावरून महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राला पक्के माहिती आहे, त्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, असेही फडणवीस म्हणाले.

‘‘महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात की, पीपीई किट राज्याला मिळाले नाहीत. केंद्र सरकारने एक डायनामिक डॅशबोर्ड तयार केला आहे, त्यावर रोज कोणत्या राज्याला किती सामुग्री दिली याची माहिती अपडेट केली जाते.

त्यानुसार, २६ मे पर्यंत ९.८८ लाख पीपीई किट, १६ लाख एन-९५ मास्क दिले आहेत. ही सामुग्री आम्ही विकत घेतो हे सांगत असताना ते हे सांगायला विसरले की, हे विकत घेण्यासाठीही केंद्राने ४६८ कोटी रुपये हे राज्य सरकारला दिले आहेत,’’

असे फडणवीस म्हणाले. दिव्यांगांसाठी देण्यात आलेले १२२ कोटी हे नियमित योजनेपेक्षा अतिरिक्त आहेत. एसडीआरएफचे पैसे हे अ‍ॅडव्हान्स आणि नियमित योजनेपेक्षा अतिरिक्त आणि अधिकचे आहेत.

केंद्र सरकारकडून डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे पैसे आले, जीएसटीचे पैसे नोव्हेंबर ते डिसेंंबरपर्यंतचे आले आहेत. जानेवारी ते मार्चच्या बाबतीत निर्णय जीएसटी कौन्सिल घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment