अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा बॉलिवूडचा दिग्गज अक्षय कुमारबरोबर काम करण्याची इच्छा कुठल्या अभिनेत्रीला होणार नाही? प्रत्येकीलाच अक्षयबरोबर जोडी बनवायची असते.
गुड न्यूजनंतर अक्की लवकरच रूपेरी पडद्यावर लक्ष्मी बम घेऊन येत आहे, परंतु आपल्याला आठवतेय का? अक्षय कुमारने गेल्या वर्षी आपला नवा चित्रपट बेल बॉटमची घोषणा केली होती. आता या चित्रपटामध्ये अक्षयच्या लिडिंग लेडीबद्दल चर्चा सुरू आहे.
या अभिनेत्रीबरोबर अक्षय पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर दिसून येणार आहे. बेल बॉटम हा एक पीरियॉडीक चित्रपट आहे, ज्यामध्ये अक्षय एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार दिग्दर्शक निखिल आडवाणी अभिनेत्री मृणाल ठाकूरला आपल्या चित्रपटामध्ये साइन करण्यास तयार झाले आहेत. कारण त्यांनी मृणालचे बाटला हाऊसमधील काम पाहिले आहे व मृणालमध्ये खूप टॅलेंट असून, ती बेल बॉटमसाठी एकदम फिट आहे, असे त्यांना वाटते.
तूर्तास अद्याप यावर चर्चा सुरू आहे, परंतु मृणालची या चित्रपटासाठी फायनल होण्याची दाट शक्यता आहे. जर सर्व काही जुळून आले तर मृणाल या चित्रपटामध्ये अक्षयच्या लव्ह इंटरेस्टच्या रूपात दिसून येईल.
वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले, तर यावर्षी मृणाल शाहिद कपूरबरोबर जर्सीमध्ये दिसून येणार आहे. याशिवाय ती तुफानमध्ये फरहान अख्तरबरोबर पहायला मिळणार आहे. मृणाल ही अलीकडेच घोस्ट सीरिजच्या कथेमध्ये दिसून आली होती. गेल्या वर्षी मृणालने सुपर-३० व बाटला हाऊस यांसारख्या चित्रपटांमध्ये लीड रोल साकारला होता.
Web Title – This actress will become Akshay’s heroine!