अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील रंगनाथ आहेर यांची कन्या श्रेया आहेर हिची नेक्स्ट जीनियस फाउंडेशन, मुंबई अंतर्गत अमेरिकेतील ड्यू युनिव्हर्सिटी न्यूजर्सी येथे पुढील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
याकरिता तिला १ कोटी ५० लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. अमेरिकेतील ड्यू युनिव्हर्सिटी न्यूजर्सीकडून संपूर्ण भारतातून एकाच विद्याथ्र्याला पूर्ण रकमेची स्कॉलरशिप दिली जाते.
सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमधून श्रेयाची निवड झाली आहे. तिने दहावीपर्यंतचे शिक्षणपारनेर पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले.
सध्या ती एमआयटी विश्वशांती गुरुकुल, पुणे येथे बारावीत केंब्रिज विद्यापीठाच्या इंटरनॅशनल बेकेलोरेट, या वर्गात शिकत आहे.
तिने जर्मन आणि फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले असून, मागील वर्षी मध्यप्रदेश राज़्यातील इंदोर येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता.
बाली इंडोनेशिया, जेकब्स विद्यापीठ ब्रेमेन, जर्मनी तसेच स्नेहालय, अहमदनगर येथे इंटरशिप प्रोग्राममध्ये तिने सहभाग घेतला होता. तसेच लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे तिची या शिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
ड्यू युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे डॉ. रेडिक कॉफेल यांनी तिला निवडीचे पत्र दिले आहे. श्रेया आहेर ह्या पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांची कन्या आहे.