अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-सध्या चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची काहीच आवश्यकता नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
लातूरमार्गे नांदेडला जात असताना राज्यमंत्री आठवले यांनी निलंगा येथे पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे उमरगा (जि.उस्मानाबाद) तालुक्यात बुध्द विहाराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून रविवारी (दि.१७) निलंगामार्गे नांदेड कडे जात असताना निलंगा येथे आरपीआयच्या पदाधिकारी,
कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना, सध्या महाराष्ट्रात मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत झालेल्या आरोपामुळे वातावरण तापले आहे.
या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का? यावर आपले मत काय? असा प्रश्न विचारला असता, मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे उत्तर रामदास आठवले यांनी दिले.
त्यांच्या उत्तरामुळे मंत्री मुंडे यांना दिलासा मिळाला असून त्यांचा मित्र पक्ष भाजपला मात्र घरचा आहेर मिळाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले निलंगा शहरात दाखल झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच गर्दी झाली होती.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved