हा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला.

या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवरही चर्चेत असून,

ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सावंत यांनी ही मागणी केली आहे. याबाबत कायदेशीर सल्­ला घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिल्­याचे सावंत म्­हणाले.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.

संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून, लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी यांना कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी मिळाली?

तसेच त्यांनी स्वत: सांगितले आहे की ज्याने ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.

अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे गोपनीयता कायद्यानुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी.

या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, म्हणून महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe