पावसाळ्यामध्ये प्रत्येकाला इच्छा असते की एखाद्या ठिकाणी मस्त बाईकने मित्रासोबत किंवा एकट्याने राईड करावी आणि कुठेतरी एखाद्या रस्त्याच्या बाजूला चहाच्या टपरीवर थांबून रिमझिम पावसाची मजा घेत चहाचा गरम खोट घशाखाली उतरवावा. असच त्यासोबत कांदा भजी राहिली तर खूपच उत्तम.
या पद्धतीचा विचार बऱ्याच जणांच्या मनामध्ये या पावसाच्या कालावधीत येतात. तसे पाहयाला गेले तर पावसाळ्याचा कालावधी म्हणजे निसर्गामध्ये मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आणि निसर्गाची उधळण पाहण्याचा कालावधी असतो.
कारण या कालावधीमध्ये निसर्ग हा हिरवाईने म्हटलेला असतो व पावसामध्ये ही हिरवाई मनाला अधिकच मोहक वाटते. त्यामुळे तुम्हाला देखील या पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातीलच काही निसर्गसमृद्ध असलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकतात.
पावसाळ्यात या ठिकाणांना भेट द्या आणि पावसाचा मनमुराद आनंद लुटा
1- माळशेज– तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचे असेल तर माळशिरस हे पुण्यापासून 128 किलोमीटर अंतरावर असलेले हिल स्टेशन एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही अनेक तलाव तसेच धबधबे, हिरवीगार वनराई तसेच डोंगर रांगा पाहू शकतात. वेगवेगळ्या प्राण्याचे दर्शन देखील तुम्हाला या ठिकाणी होते. एवढेच नाही तर हिरव्यागार टेकड्या आणि आकर्षक गुलाबी फ्लेमिंगो सह हे ठिकाण पावसाळ्यामध्ये पाहण्यासाठी अतिशय सुंदर ठरते.
2- महाबळेश्वर– आपल्याला माहित आहे की महाबळेश्वरला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते व हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी असलेली हिरवीगार निसर्ग सौंदर्य तसेच सुंदर बगीचे अशी अनेक निसर्गाने समृद्ध स्थळे पाहायला मिळतात.
स्वच्छ हवामान असेल तर तुम्ही या ठिकाणाहून रायगड किल्ला तसेच तोरणा किल्ला स्पष्टपणे पाहू शकता. याशिवाय या ठिकाणी असलेले टायगर स्प्रिंग, इको पॉइंट आणि एलफिस्टन पॉईंट सारखे ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे.
3- पाचगणी– हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगररांगांनी वेढलेले थंड हवेचे ठिकाण असून या ठिकाणी तुम्ही हायकिंग तसेच ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग चा आनंद घेऊ शकता. पाचगणीला तुम्ही लिंगमळा धबधबा, कास पठार तसेच देवराई कला गाव, कमलगड किल्ला, राजपुरी लेणी, धोम धरण, प्रतापगड किल्ला तसेच सिडनी पॉइंट व पारसी पॉईंट असा अनेक ठिकाणी पाहू शकता.
4- भातसा नदी खोरे– महाराष्ट्रातील हे पावसाळ्यातील भेट देण्यासाठी एक बेस्ट पर्याय असून या ठिकाणी हिरव्यागार आणि खोऱ्यांमधून वाहणाऱ्या नदीचे एक विहंगम दृश्य तुम्ही पावसाळ्यात पाहू शकता. हे खोरे भातसा नदीच्या खोऱ्यात आणि थळ घाटाच्या शेवटी आहे. पावसाळ्यामध्ये इगतपुरी या ठिकाणी असलेले हे ठिकाण अनेक नवीन नैसर्गिक दृश्य आणि वनस्पतींनी आणि काळ्याशार खडकाळ रचनांमुळे अधिक सुंदर दिसते.
5- कळसुबाई शिखर– आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील हे सर्वात उंच शिखर असून याची उंची १७४६ मीटर म्हणजे जवळपास 5400 फूट आहे. हे शिखर हरिचंद्र गड वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेत असून या ठिकाणाहून तुम्ही अनेक नयनरम्य आणि नैसर्गिक सुंदर अशी दृश्य पाहू शकतात.