केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील महागाईभत्ता(Dearness Allowance)वाढीसंदर्भात सातत्याने मागणी करण्यात येत होती. ह्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्य शासनाच्या(State Administration)सेवेत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकार(State Government)ने घेतलेला आहे.
एवढेच नाही तर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांची थकबाकी देखील रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 17 लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.
![d](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-d-3.jpg)
राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली चार टक्के वाढ
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राज्य शासनाच्या सेवेमध्ये जे अधिकारी व कर्मचारी आहेत यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी देण्यात आली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय(Decision) राज्य सरकारने नुकताच घेतलेला असून एक जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता दिला जातो.
यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे तो 38 टक्क्यांवरून 42 टक्के इतका झाला आहे. एक जानेवारी 2023 पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे व पाच महिन्याची थकबाकी सह जून महिन्याच्या वेतनापासून ते देण्यात येणार आहे. तसेच पाच महिन्याची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागाने नुकताच जारी केला असून या निर्णयाचा फायदा आता राज्यातील 17 लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे.
केंद्र सरकारने देखील केली महागाईभत्त्यामध्ये चार टक्के वाढ
केंद्र सरकारने 3 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली असून महागाई भत्ता आणि घर भाडेभत्त्यामध्ये करण्यात आलेली ही वाढ जानेवारी 2023 पासून कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा याआधी महागाई भत्ता 38% होता. त्याच्यात आता चार टक्के वाढ करून त्यांचा महागाईभत्ता देखील 42 टक्के इतका झालेला आहे. अगदी याच पद्धतीने आता राज्य सरकारने देखील महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ करून कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिलेला आहे.