या कारणामुळेच पाचपुते झाले पुन्हा आमदार, विरोधकांनी स्वतःचे सामाजिक योगदान तपासावे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते गेली चार दशकापासून तालुक्याच्या विकासासाठी कष्ट घेत आहेत. त्याचेच फळ म्हणून त्यांना जनतेने वेळोवेळी आमदार म्हणून संधी दिली.

राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीची सभागृहात ओळख या जनतेने निर्माण करून दिली.काम करणाऱ्या बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करण्यापूर्वी घनश्याम शेलार यांनी स्वतःचे सामाजिक योगदान काय, हे तपासून पहावे, असा उपरोधक सल्ला देत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी शनिवारी शेलारांवर टीका केली.

कोरोना संदर्भात राज्य सरकार निष्काळजी असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर शेलार यांनी पाचपुते यांच्यावर टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना नागवडे म्हणाले, कोरोनाबाबत सतर्क राहावे लागेल, हे पत्र सर्वात आधी पाचपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते.

तेव्हा कोरोना काय आहे, हे कोणाला माहीत ही नव्हते. श्रीगोंदे तालुक्यावर लोकप्रतिनिधी म्हणून पाचपुते बारकाईने ने नजर ठेवून आहेत. अधिकाऱ्यांशी समन्वय साधत त्यांना आवश्यक सूचना देत आहेत. शिवाय बफर झोन असलेल्या तालुक्यातील दोन गावात जाऊन स्वतः पाहणी करून लोकांना आधार त्यांनी दिला.

शिवाय लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकास निधी असलेल्या पन्नास लाखातून ४ व्हेंटिलेटर व इतर आवश्यक साधनसामग्री ची मागणी पाचपुते यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे केली. राज्य सरकार कोठे तरी कमी पडले म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका केली.

घनश्याम शेलार यांनी या संकट काळात रस्त्यावरच्या एखाद्या माणसाची तरी विचारपूस केली का? समाजासाठी शेलारांच काय योगदान आहे. हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावा. शेलारांच्या पक्षाचे सरकार आहे.

या संकट काळात सरकारकडून शेलारांनी काय मिळवून दिले. ज्यांनी ज्यांनी पाचपुतेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला, त्या सर्वांना तालुक्यातील जनतेने पराभूत करून आत्मपरीक्षण करायला लावले. त्यामुळे शेलार यांनी ही आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला ही नागवडे यांनी यानिमित्ताने दिला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment