महाराष्ट्रावर कोसळणार हे नवे संकट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम :-अस्मानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यातील बळीराजासमोर सातत्याने अडचणी वाढत आहेत. महापुरात पिके वाहून गेल्यानंतर प्रयत्नाची पराकाष्टा करत घेतलेली उन्हाळी पिके सध्या बाजारपेठा बंद असल्याने शेतातच कुजत आहेत.

या संकटातून बाहेर पडण्यापूर्वीच बळीराजाला खरीब हंगामात बियाणे टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या देशी बियाणांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

राज्यात महापुराचा फटका शेतकरीवर्गासह बीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही बसला आहे. राज्यात भातासह भुईमूग, सोयाबीन आणि इतर बियाणे पुरवण्यात अग्रेसर असलेल्या महाबीजसह इतर कंपन्यांचे शेकडो हेक्टरवरील बियाणांचे प्लॉटच कुजून गेले.

त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत या कंपन्यांकडे भातासह इतर सर्वच प्रकारचे बियाणे खूपच कमी प्रमाणात संकलित झाले. हे बियाणे सध्या कंपन्यांच्या गोडाऊनमध्ये अडकून पडले आहेत.

त्यांच्यावर प्रक्रिया करून ते विक्रेत्यापर्यंत पाठवण्यासाठी कामगारवर्गच नसल्याने आगामी काळात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment