कोरोनावरील लसीचा पहिला डोस या व्यक्तीला मिळणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे, या व्हायरसमुळे जगभरात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.

याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर लस शोधण्याचे काम सुरु आहे. यातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे.

90 वर्षांच्या मार्गारेट किनान यांनी जगातील पहिली कोरोना लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे.

आजपासून लशीकरण सुरू झालं आहे. मार्गारेट किनान यांना पहिली लस देण्यात आली. सेंट्रल इंग्लंडच्या कॉन्वेंट्री शहरातील रुग्णालयात त्यांचा लशीचा डोस देण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी लस घेतली. ज्येष्ठ नागरिक असलेल्या मॅगी आजींवर फायझरची लस काय परिणाम करत याकडे अनेकांचे लक्ष आहे.

जर आजींना फायझरच्या कोरोना लशीचा फायदा झाला तर फायझरची लस घेण्यासाठी स्वच्छेने पुढे येणाऱ्यांच्या संख्येत एकदम वाढ होण्याची शक्यता आहे.

फायझरची लस उपलब्ध झाली असली तरी अद्याप अनेकांची लस टोचून घेण्याबाबत द्विधा मनस्थिती आहे. आजींना लशीचा फायदा झाला तर ही परिस्थिती बदलेल, असा विश्वास इंग्लंडच्या आरोग्य मंत्रालयाला वाटत आहे.

फायझर कंपनीने त्यांची लस 95 टक्के यशस्वी झाल्याचे सांगत आधी आपत्कालीन वापरासाठी इंग्लंड आणि बहारिनकडून मंजुरी मिळवली. यानंतर इंग्लंडने फायझरच्या लशीला व्यापक लसीकरण मोहिमेसाठी परवानगी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe