अहमदनगर जिल्ह्यात ४.२५ लाख डबे वितरित करणारी ‘ही’ सेवा रविवारी थांबणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निम्मे शहर हॉटस्पॉट घोषित झाले. तसेच संपूर्ण नगर टाळेबंदीमुळे ठप्प होते. याप्रसंगी 7 मित्रांनी एकत्रित येऊन एक मेसेज पाठविले, कोण उपाशी असेल तर 9423162727 या नंबर ला संपर्क करावा, मेसेज व्हायरल झाले. पहिल्या दिवशी 350 जेवणाचे पाकीट घरा-घरातून तयार करून देण्यात आले.

यानंतर अनेक भागात राहणार्‍या हातावार पोट असलेल्या सर्वसामान्य कामगार व नागरिकांची भूक भागवण्यासाठी 22 मार्च पासून कोणीही उपाशी राहू नये यासाठी सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती आणि पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या मागील साडेसात महिन्यापासून लंगर सेवा सुरू झाली.

सर्व व्यापार व उद्योगधंदे बंध असताना ही सेवा सुरू करण्यात आली आणि आजही ही सेवा अविरतपणे सुरू आहे. सध्या जनजीवन सुरळीत होत असताना रविवार दि.8 नोव्हेंबर पासून ही लंगरसेवेचा समारोप होणार आहे. तर वेळ पडली तर पुन्हा उभे राहून मदतीचा हात देण्याची तयारी लंगर सेवेच्या सेवादारांनी दर्शवली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य बाजारपेठसह निम्मे शहर हॉटस्पॉट झाले होते. हॉटस्पॉट व टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडून हातावर पोट असलेल्या कामगार, विद्यार्थी, एकटे राहणारे वयस्कर यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.

ही जाणीव ठेऊन 22 मार्च पासून लगंर सेवेच्या वतीने अन्नाचे पाकिट पुरविण्याची सेवा सुरु करण्यात आली. तसेच 2350 गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतक्या प्रमाणात किराणा किटचे वाटप करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही सेवा सध्या चालू असून,

नागरिकांना सुरवातीला दोन वेळेस आणि 1 जुलै नंतर संध्याकाळचे एक वेळचे जेवण दररोज देण्यात आले. पोलीस मुख्यालय येथील सभागृहात हायजनिक पध्दतीने व फिजाकल डिस्टन्सचे पालन करुन जेवण बनविण्यात येत आहे. या लंगरसेवेला 31 ऑक्टोबर रोजी 223 दिवस पुर्ण होत असून,

4 लाख 25 हजार डबे आज पर्यंत वितरीत करण्यात आल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. सदर उपक्रम पोलीस अधिक्षक मनोज पाटील, तत्कालीन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके आणि विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

लंगरसेवेत हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, किशोर मुनोत, करन धुप्पड, राजा नारंग, सनी वधवा, जस्मितसिंह वधवा, सिमर वधवा, टोनी कुकरेजा, राहुल बजाज, सुनिल मेहतानी, रोहित टेकवानी, संदेश रपारिया, नारायण अरोरा, गुरभेजसिंग, शरद बेरड, पुरुषोत्तम बिट्टी, प्रमोद पंतम, कैलाश नवलानी आदि सेवादार म्हणून काम पाहत आहे.

या काळात विविध सण बैसाखी, संत कंवरराम जयंती, महावीर जयंती, बकरी ईद, मोहंमद पैगंबर जयंती, रमजान ईद, गणेश उत्सव, नवरात्र, श्री महाप्रभुजी जयंती, महाराष्ट्र आणि कामगार दिवस, लोकसहभाग घेऊन विशेष फुड पॅकेट बनवून सर्वसामान्यांचे सण, उत्सव गोड करण्यात आले. या काळात श्रमिक, परप्रांतीय यांना जेवण,

11 श्रमिक रेल्वे गाड्यांमध्ये 10 हजार पेक्षा जास्त प्रवाश्यांना जेवण आणि पाणी, पायी जाणार्‍या परप्रांतीय लोकांकरिता जेवण, पाणी आणि अनेकांना महाराष्ट्र सीमेपर्यंत गाड्याने सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अमृतसर, सातारा या श्रमिक रेल्वेला 1 तासात जेवण पुरवल्याने खासदार श्रीनिवास पाटील यांनी लंगरसेवेचे कौतुक केले.

लाल परीने कोटा येथून निघालेल्या चार बस मध्ये दोन दिवसापासून उपाशी विद्यार्थी यांचा 1 मे रोजी जेवण आणि पाणी देण्यात आले. रस्त्यावर फिरणारे मुके जनावर यांच्या करिता चार्‍याची व खाद्याची सोय करण्यात आली. ऊस तोड कामगाराचे अनेक बैलगाड्या त्यांच्या गावी पोहचण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यात आले.

ऑनलाइन शिक्षण सुरु झाल्याने 650 गरीब विद्यार्थ्यांसाठी जुने मोबाईल, संगणक, लॅपटॉप आदी शिक्षण साहित्य देण्यात आले. घर घर लंगर सेवेच्या वतीने 82 दिवसापासून संपूर्ण शहरात मन्सूरी युनानी आणि आयुर्वेदिक काढा वाटप सुरु आहे. याचा चार हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला आहे.

या सर्व उपक्रमात जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, विपुल शहा, परशुराम मेहतानी, दीपक कुकरेजा, गोविंद खुराणा, पुनीत भुटानि, बल्लू सचदेव, दलजीतसिंग वधवा, सुनील थोरात, सनी वधवा, जास्मितसिंह वधवा, विकी मेहरा, दामोदर माखिजा, अनिश आहुजा, राहुल शर्मा, रामसिंग कथुरीया, अजय पंजाबी, दिनेश चोपडा, ईश्‍वर बोरा, भरत बागरेचा,

दिनेश छाबरिया, दिनेश भाटिया यांनी सहकार्य केले. याच बरोबर फक्त महिलांकरिता महराष्ट्रातील प्रथम गुरु अर्जुनदेव कोविड केअर सेंटर अहमदनगर महानगरपालिका आणि पोलिस दलाच्या वतीने सुरू करण्यात आले. या सर्व सेवा 8 नोव्हेंबर पासून तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात येणार असल्याची माहिती लंगर सेवेच्या वतीने देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment