‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- करोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. “अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो.

हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनेतला एवढंच सांगणं आहे की, तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे.

असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.” असं पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment