अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधले आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे ऐन पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मोठा राजकीय वाद उभा केला होता.

यावरून गेले तीन-चार दिवस शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये तणाव होता. त्यानंतर असनेक राजकीय घडामोडींना वेग आला. त्यानंतर बुधवारी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजित पवारांनी मंत्रालयात बोलावून घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक हजर झाले. पवारांनी या पाचही नगरसेवकांना नार्वेकरांकडे सोपविले.
यानंतर या नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात आले. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews