श्रीगोंद्यात कोंबड्यांवरून बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी

Published on -

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण येथील शेतकरी महिला लवंगाबाई विश्वनाथ घोगरे यांच्या शेताजवळ राहणाऱ्या आरोपीच्या कोंबड्यांनी घाण केली तसेच मेथीच्या पिकाचे नुकसान केले.

याबाबत लवंगाबाई घोगरे यांनी कोंबड्यावाल्या आरोपींना तुमच्या कोंबड्या आवरा त्यांनी नुकसान केले. याचा जाब विचारल्याने त्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन हात फॅक्चर करण्यात आला.

लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी लवंगाबाई घोगरे यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी

उत्तम ज्ञानदेव घोगरे, सिंधू उत्तम घोगरे, रोहिणी गणेश घोगरे, सर्व रा. महांडूळवाडी, मांडवगण, श्रीगोंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe