अहमदनगर ब्रेकिंग :- बंगला नावावर करण्याची धमकी,महिला डॉक्टरने अखेर संपविले जीवन !

Published on -

अहमदनगर :- अहमदनगर शहरात गुलमोहोर रोड, नवनाथनगर, कोहिनूर मंगल कार्यालयाच्यामागे प्लॉट क्र. २ संतोषी निवास येथे राहणाऱ्या डॉ. सुजाता आसाराम साळवे, वय ४९ या डॉक्टर महिलेला चौघा आरोपींनी वेळोवेळी त्यांच्या नावावरील बंगला आरोपींच्या नावावर करण्यासाठी मारहाण करुन शिवीगाळ केली दमदाटी केल्याने डॉ . सुजाता आसाराम साळवे, वय ४९ (अहमदनगर) या महिलेने आत्महत्या केली.

याप्रकरणी डॉ. सुजाता साळवे यांच्या आई जमुनाबाई आसाराम साळवे, रा. प्लॉट क्र. २, संतोषनिवास कोहिनूर मंगल कार्यालयाच्यामागे, नवनाथनगर, गुलमोहोर रोड, अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे आरोपी गणेश विलास खांडरे, विजय विलास खांडरे, सरला विलास खांडरे, विलास नामदेव खांडरे, सर्व रा. महादेव मंदिराजवळ, बंजारगल्ली, अहमदनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्महत्येचा प्रकार २ डिसेंबर रोजी घडला. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe