69 व्या वर्षी न थकता त्यांनी कळसुबाई सर केले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  प्रतिवर्षी महाराष्ट्रातील एका किल्ल्यावर व्यसनमुक्त युवक संघाचे युवक प्रतापी संस्कार शिबिर होत असते. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील युवक या शिबिरात सहभागी होतात व व्यसनमुक्तीचा संकल्प करतात.

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संतवीर वारकरी बंडातात्या कराडकर यांनी वयाच्या 69 व्या वर्षी न थकता अडीच तासांत आपल्या 100 व्यसनमुक्त युवक सहकार्‍यांसोबत कळसुबाई शिखर सर केले.

9 वर्षांपासून ते 74 वर्षापर्यंत या वयोगटातील तरुण या उपक्रमात सहभागी झाले होते. शिखरावरचे निसर्गरम्य परिसर व वातावरण पाहून खूप समाधान व आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाने व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक हे ब्रीद घेऊन वारकरी विचार अंगीकारून जीवन जगतात.

हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे. बंडातात्या कराडकर हे कोल्यातून मुंबईकडे जात असताना नेहमी कळसुबाई शिखर त्यांना साद घालत होते, म्हणून आपला अपूर्ण राहिलेल्या संकल्प हा कळसुबाई शिखर सर करून त्यांनी पूर्ण केला.

या शिबिरासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून युवक आले होते. रात्री चितळवेढे गावात माऊली आरोटे यांच्याकडे मुक्काम करून सकाळी पाच वाजता निघून सकाळी सहा वाजता बारी गावातून प्रार्थना करून चढाईला सुरुवात केली.

हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसुबाई माता की जय, अगस्ती महाराज की जय अशा घोषणांचा निनाद करत वारकरी पताका घेऊन तात्यांनी व सहकार्‍यांनी कळसुबाई शिखर सर केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe