आज सर्व तहसील कार्यालयासमोर मराठा समाज करणार ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.

परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी, यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज (सोमवार) जिल्ह्यातील तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

ह्या आहेत मागण्या –

– सकल मराठा समाजाच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 12 टक्के जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी वाढवाव्यात.

– मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही नोकर भरती करण्यात येऊ नये. – मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नयेत.

– 11 ऑक्टोबर व नजीकच्या काळात होत असलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. – केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा.

– मराठा समाजास हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळावे, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश देणेपूर्वी सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजातील प्रवर्गातून अर्ज केलेल्या एसईबीसी उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या व लाभ देण्यात यावेत. आदींसह अनेक मागण्या असून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment