अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही लोक अफवा पसरविण्याचे काम करत आहेत.
तसेच मध्यंतरी टोमॅटोवरील न्यू तिरंगा विषाणू असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही.
कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज पसरू नये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी.एन.एस.मूर्ती व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले आहे.
तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिक धोक्यात आले आहे. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. मात्र टोमॅटोवर आलेला रोग आणि कोविड-१९ याचा दुरान्वये कोणताही संबंध नाही असेही ते म्हणाले.
टोमॅटो बाधित करणा-या विषाणूची तपासणी व्हावी म्हणून फळ, पान आणि बियाणे बेंगलोरच्या इंडियन कौन्सिल अॅग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) संस्थेकडे पाठविण्यात आले आहे.
टोमॅटोला कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला हे राष्ट्रीय संशोधन संस्थांद्वारे फास्ट्राक मोडमध्ये शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. फळे खाण्यामुळे कोरोना विषाणूपेक्षा बरीच गुंतागुंत उद्भवू शकते? हे चुकीचे आहे.
आजपर्यंत कोणत्याही वनस्पती विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टर्स नसतात. जगातील लोक आधीच तणावग्रस्त आहेत.
त्यात गैरसमज होईल आणि शेतीचे नुकसान होईल, अशा बातम्या पसरवू नये असे पत्र फलोत्पादन आयुक्त डॉ.मूर्ती यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com