Nashik Tourist Place : पावसाळ्यात फिरायला जा नाशिक जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी ! स्वर्ग…

पावसाळ्याच्या कालावधीमध्ये निसर्गाने देखील एक सुंदर रूप धारण केलेले असते व सगळीकडे हिरवाईने नटलेली अवघी सृष्टी व वरून रिमझिम स्वरूपात कोसळणारा पाऊस यामध्ये प्रवास करून निसर्गाच्या सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या ठिकाणांना भेट देणे खूप महत्त्वाचे असते व यामुळे व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर फ्रेश होतो व मूड देखील चांगला होतो.

Ajay Patil
Updated:

Tourist Place:- पावसाळ्यामध्ये कुठेतरी फिरायला जाणे व दररोजच्या ताण-तणावाच्या आयुष्यातून काही क्षण निवांतपणे घालवायचे असतील तर हा कालावधी खूप महत्त्वाचा असतो व याकरिताच राज्यातील आणि देशातील अनेक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते.

कारण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये निसर्गाने देखील एक सुंदर रूप धारण केलेले असते व सगळीकडे हिरवाईने नटलेली अवघी सृष्टी व वरून रिमझिम स्वरूपात कोसळणारा पाऊस यामध्ये प्रवास करून निसर्गाच्या सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या ठिकाणांना भेट देणे खूप महत्त्वाचे असते व यामुळे व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर फ्रेश होतो व मूड देखील चांगला होतो.

याच पद्धतीने तुम्हाला देखील या पावसाळ्यात कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्ही नाशिकच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकतात.

नाशिक जिल्ह्याच्या परिसरातील उत्तम पर्यटन स्थळे

1- रतनवाडी नाशिकच्या जवळ असलेले नयनरम्य ठिकाण म्हणजे रतनवाडी होय. तसे पाहायला गेले तर हे अहमदनगर जिल्ह्यात असलेले एक सुंदर आणि मनमोहक गाव म्हणून प्रसिद्ध आहे व या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य मनाला निरव अशी शांतता देते.

या गावाचा परिसर संपूर्णपणे डोंगराळ असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणचा हिरवागार निसर्ग आणि ओली चिंब झालेली रस्ते मनाला भुरळ घालतात. या ठिकाणचे आर्थर लेक पर्यटकांचे एक आकर्षण असून ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण उत्तम आहे.

2- डहाणू नाशिकच्या जवळ असलेले आणि निसर्गाने मनमोहकतेने नटलेले ठिकाण म्हणून डहाणू ओळखले जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर डहाणू वसलेले असून या ठिकाणी असलेले निसर्गाचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अगदी खुलून दिसते.

या ठिकाणचे डहाणू बीच हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून या बीचवरून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक रूप पाहू शकता.

3- सापुतारा नाशिक पासून जवळ असलेले हे उत्तम हिल स्टेशन असून गुजरात राज्यातील एकमेव हिल स्टेशन म्हणून देखील सापुतारा ओळखले जाते.

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले हे एक निसर्गाने नटलेले उत्तम असे ठिकाण असून या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात गेला तर स्वर्ग सुखापेक्षा तुम्हाला कमी आनंद मिळणार नाह. या ठिकाणी फोटोशूटचा आनंद घेता येऊ शकतो.

4- सिल्वासा दमण आणि दिव मधील थेट पर्यटकांसाठी आवडते असे ठिकाण असून या ठिकाणी जर तुम्ही पावसाळ्यामध्ये फिरायला गेलात तर या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ पाडते.

सिलवासा हे ठिकाण पोर्तुगीज संस्कृतीतील एक सुंदर शहर असल्यामुळे त्या ठिकाणी या संस्कृतीच्या अनेक खानाखुणा पाहायला मिळतात. नाशिक पासून हे 128 ते 130 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला फिरायला जायचा प्लान असेल तर सिल्वासा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe