अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्यांना रोख लावण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दरदिवशी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करत वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे आव्हानच पोलीस प्रशासनाने स्वीकारलं आहे.
नुकतीच तालुक्यातील अरणगाव शिवारातील यशांजली हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून 7 हजार ( रा. अरणगाव ता. नगर) याच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी कि, अरणगाव शिवारात यशांजली हॉटेलमध्ये विनापरवाना दारूचा साठा करून
त्याची विक्री केली जात असल्याची माहिती अप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांना मिळाली होती. पोलीस पथकाने तात्काळ हॉटेलवर पंचासमक्ष छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या झाडाझडतीत देशी- विदेशी दारूचा साठा मिळून आला.
पोलिसांनी सर्व साठा जप्त केला आहे. विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी गणेश डहाळे, भरत डंगोरे, घुले, धामणे यांनी ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved