अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कर्जत शहरातील नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/07/dr-kakde.jpg)
हजारो लोकांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉ. काकडे यांनी कित्येकांचे जीव वाचवले. मात्र आजारपणात त्यांचे दुःखद निधन झाले आहे. डॉक्टर काकडे यांच्या निधनाने कर्जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
कर्जत येथील डॉक्टर विलास काकडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. सुरुवातीला ते कोरोना पॉझिटिव्ह होते. मात्र नंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.
मात्र त्यांच्या शरीरातील इतर अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. सुरुवातीला काकडे यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
नंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. त्यांच्यावर नॉन- कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि आज पहाटे ते काळाच्या पडद्याआड गेले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा