अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत भोये यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी रविवारी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक राजेंद्र चव्हाण हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे
तर वाघ यांची प्रशासकीय बदली करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे. विकास वाघ यांनी स्वतःवर गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. याबाबत पोलिस उपअधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून पोलीस अधीक्षकांना अहवालही सादर केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews