दसरा आणि दिवाळी सारखे भारतीय परंपरेतील महत्त्वाचे सण आता तोंडावर आल्यामुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर ताण येण्याची शक्यता आहे.
ही समस्या लक्षात घेता भारतीय रेल्वे विभागाच्या दक्षिण मध्य रेल्वेने दसरा व दिवाळी सणाला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काझीपेट- दादर- काझीपेट ही फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या सणासुदीच्या कालावधीत गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होणार आहे व प्रवास करणे सोपे होणार आहे.
विशेष म्हणजे ही फेस्टिवल स्पेशल ट्रेनच्या 26 फेऱ्या होणार असून ही सतरा डब्यांची ट्रेन असून यामध्ये जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी 17 डब्यांची ही ट्रेन असणार आहे.
दसरा दिवाळीनिमित्त मुंबईस फेस्टिवल स्पेशल ट्रेन सोडणार
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वे विभागाच्या दक्षिण मध्य रेल्वेने दसरा आणि दिवाळी सणाला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काझीपेट- दादर -काझीपेट ही फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला
असून या उत्सवाच्या कालावधीत धावणाऱ्या या फेस्टिवल स्पेशल ट्रेनच्या 26 फेऱ्या होणार आहेत. ही 17 डब्यांची ट्रेन असणार असून यामध्ये जनरल, स्लीपर तसेच एअर कंडिशनर डबे असणार आहेत.
गाडी क्रमांक 07195 चा रूट आणि थांबे
यातील गाडी क्रमांक 07195 काझीपेट दादर मार्गे करीमनगर, निजामाबाद, नांदेड, औरंगाबाद ही विशेष गाडी 16, 23 ऑक्टोबर आणि 13, 20 व सत्तावीस नोव्हेंबर रोजी दर बुधवारी काजीपेट स्थानकावरून दुपारी तीन वाजता सुटेल. त्यानंतर जमिकुंता,पेद्दपल्ली, करीमनगर, लिगामपेठ, जागीत्याल, कोरटला, मेतपल्ली, अरमुर, निजामाबाद, बासर,
धर्माबाद, उमरी, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतुर, जालना, छत्रपती संभाजी नगर, लासुर, रोटेगाव, नगरसुल, अंकाई, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल.
गाडी क्रमांक 07197 चा रूट आणि थांबे
गाडी क्रमांक 07197 काझीपेट दादर ही स्पेशल ट्रेन बल्लारशा, पिंपळखुट्टी तसेच आदिलाबाद,किनवट, नांदेड आणि औरंगाबाद मार्गे जाईल व ही ट्रेन 12, एकोणावीस व 26 ऑक्टोबर आणि 2,9,16,23 व ३० नोव्हेंबर रोजी दर शनिवारी काजीपेट येथून सकाळी 11:30 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर ती जम्मीकुंता, पेद्दपल्ली, मंचिर्याल,
बेलामपल्ली, शिरपूर कागझनगर, बल्लारशा, चंद्रपूर, भांडक, वनी, कायेर, पिंपळकुट्टी, आदिलाबाद, किनवट, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतुर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसुल, अंकाई, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल.
गाडी क्रमांक 07198 चा रूट
दादर काझीपेट ही गाडी 13,20, व 27 ऑक्टोबर व त्यासोबत 3,10,17, व 24 नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी दादर येथून दर रविवारी दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी सुटेल व आलेल्या मार्गानेच काझी पेटला दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
निजामाबाद व करीमनगर मार्गाने धावेल ही ट्रेन
गाडी क्रमांक 07196 दादर काझीपेट मार्गे औरंगाबाद, नांदेड, निजामाबाद व करीमनगर या मार्गाने जाणारी ही विशेष गाडी 17 व 24 ऑक्टोबर व 14, 21 आणि 28 नोव्हेंबर रोजी दादर येथून दर गुरुवारी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल व आलेल्या मार्गानेच दुसऱ्या दिवशी काजीपेट येथे दुपारी चार वाजता पोहोचेल.