राज्यातील ‘ह्या’ भाजप आमदारांच्या कारचा अपघात,दोघांचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी असे दोघांचा मृत्यू झाला आहे. आमदार किसन कथोरे यांच्याही मणक्याला दुखापत झाली आहे.

त्यांना उपचारासाठी कल्याणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत, कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार किसन कथोरे हे आपल्या गाडीने टिटवाळ्याहून बदलापूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी दहागाव-रायते परिसरात वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने थेट आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला धडक दिली. वेगाने आलेला दुचाकीस्वार आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला धडकला.

दुचाकीस्वाराची किसन कथोरे यांच्या गाडीला इतकी जोरदार धडक बसली की अपघातात या दोंघाच्या ही मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकीवरील अमित नंदलाल सिंग (२२) व सिमरन दिपक सिंग रा. नेतीवली यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आमदार कथोरे यांच्या गाडीचे चालक बाजूला समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

किसन कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. सलग तिसऱ्यांदा ते मुरबाड मतदारसंघातून विजयी होत आहेत.

२००४ च्या निवडणुकीत किसन कथोरे हे अंबरनाथ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. दरम्यान ह्या भीषण अपघातानंतर टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे, पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment