दिल्ली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. ‘राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावे’ या साठी आघाडीत एकमत झाले आहे. असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज्याच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने मुंबईत सर्वात महत्त्वाची बैठक झाली. नेहरु सेंटरमधील या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के सी वेणुगोपाल या सर्वांनी पहिल्यांदाच एकत्र बसून चर्चा केली.
या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार हे निश्चित होतं. शिवाय महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, हे ही या बैठकीत अधिकृत ठरवण्यात येत आहे.
या बैठकीला दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तब्बल दोन तासानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बैठकीतून बाहेर आले.
उद्या पत्रकार परिषद होईल.अजून दोन ते तीन तास बैठक चालेल महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.