अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली.
दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली.
दत्त चौकात झालेल्या या आंदोलनात रावसाहेब दानवे विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पुतळ्याला चपलांनी बदडल्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिक आणि पोलिसात चांगलीच झटापट देखील झाली. मला ही गाडी शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकसहभागातून गाडी दिलीय.
दानवे जर शेतकऱ्यांचा अपमान करत असतील तर याची गरज काय ? दानवेंची जीभ कापणाऱ्यास ही गाडी मी भेट देईन तसेच १० लाखाच बक्षीस देईन असे संतोष ढवळे म्हणाले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये