अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे चौकीच्या अलीकडे रामवाडी शिवारात भोजडे येथील एक इसम सुनबाईला दुचाकीवर घेवून कोपरगाव येथून संजीवनी कारखाना रस्त्याने भोजडे गावी जात असताना तिघा आरोपींनी दुचाकी अडवून दुचाकी चालक यांना बेदम मारहाण केली व नाकावर मारुन जखमी केले.
तसेच संबंधित इसमाची सून हिचा आरोपींनी साडी ओढून लजा उत्पन्न होईल , असे वर्तन करुन विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
काल याप्रकरणी विनयभंग झालेल्या तरुणीचे जखमी सासरे यांनी कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण व विनयभंग करणारे आरोपी साहेबराव भानुदास काळे, निखील साहेबराव काळे , समाधान बाबासाहेब मनोहर,
सर्व रा. रामवाडी, संवत्सर , ता . कोपरगाव यांच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ ३२५ , ३४१ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि मानगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.