अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेव्हा वीजप्रवाहा खंडित करण्याच्या दृष्टीने हालचाली देखील सुरु आहेत.
यामुळे आता सर्वत्र संतापाची लाट उसळू लागली आहे. महावितरणाच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून दि. 5 फेब्रुवारी रोजी उत्तर नगरमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आ. राधाकृष्ण विखे पाटील,
स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी महावितरणाच्या कार्यालयावर हल्लाबोल करत टाळे ठोकून आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी घरगुती ग्राहकांकडे वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा सक्ती करत आहे. मोबाईलवरून नोटीस पाठवून वीज बिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे म्हणतात.
जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही नियमित बिले भरणार नाही, असे महावितरणला यामागेही झालेल्या आंदोलनात सांगण्यात आले होते.
तरीही सक्ती करणार असाल तर आक्रमक भूमिका घेण्यात येईल. तरीही सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर महावितरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी स्पष्ट केले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved