अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- अॅमेझॉन वर व्हिवो कार्निवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये व्हिवो स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात भारी सूट दिली जात आहे. हा सेल Amazon वर 6 जानेवारीपासून सुरू झाला आहे, जो 9 जानेवारीपर्यंत लाइव असेल.
विवोच्या व्ही आणि वाय सीरीजच्या स्मार्टफोनवर या सेल मध्ये सूट देण्यात येत आहेत. आपणही व्हिव्हो फोन घेण्याची योजना आखत असाल तर हा सेल चांगली संधी आहे. विवोच्या या सेलमध्ये व्ही आणि वाय सीरीज विवो व्ही 20 प्रो, विवो व्ही 20 2021, विवो व्हीएस 1 प्रो, विवो वाय 51 या स्मार्टफोनवर डिस्काउंट उपलब्ध आहे.
कोणत्या फोनवर कोणती ऑफर आहे आणि किती रुपये डिस्काउंट उपलब्ध आहे ते जाणून घ्या –
>> या सेलमध्ये 44 एमपीचा सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V20 Pro 5G फोन 29,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोन खरेदीदार त्यांच्या जुन्या स्मार्टफोन एक्सचेंज करून 2 हजार रुपयांची सूट मिळवू शकतात.
>> , व्हिवो व्ही 20 2021 हँडसेट 24,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर आहे आणि यात 44 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे.
>> 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा आणि 33 वॅटचा फास्ट चार्जिंग सेल असलेला विव्हो व्ही 20 एसई 20,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 2 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
>> सेलमध्ये विवो व्ही 19 हा 24,990 रुपयांना आणि व्हिवो एस 1 प्रो 18,990 रुपयांना विकला जात आहे.
अॅमेझॉनला वीवो व्ही 19 वर 5 हजार रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे.
>> व्हिव्हो वाय 51 हा 17,990 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट स्कॅनर, रियर 48 एमपी कॅमेरा आहे.फोन खरेदीवर एक हजार रुपयांची एक्सचेंज सवलत आहे.
>> व्हिवो वाई 11 आणि व्हिवो वाय 91 ए हे बजेट फोन 9,490 आणि 7,990 रुपयांना विकले जात आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved