‘या’ कारणामुळे केला आ.वैभव पिचड यांनी भाजप प्रवेश

Ahmednagarlive24
Published:

अकोले: अकोले तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला मोठ्या मनाने प्रवेश देऊन स्वागत केले ही आनंदाची बाब आहे. पक्षात काम करताना नवीन जुने कार्यकर्ते यांचा मेळ घालू, असे प्रतिपादन आ. वैभवराव पिचड यांनी केले.

आमदार वैभव पिचड यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचेही राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे पाठविल्याने खळबळ उडाली आहे. उद्या शनिवार दि. २७ रोजी पंकज लॉन्समध्ये सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून निर्णय जाहीर करू, असेही आ. पिचड यांनी स्पष्ट केले आहे. .

आज अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत सर्वांनीच माजीमंत्री मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य राहील, असे नमूद केले. दरम्यान राष्ट्रवादीच्या सर्व पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे पाठवून दिले असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी सांगितले.

आ. वैभवराव पिचड व सहकाऱ्यांच्या या भूमिकेने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी आ. पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात आजवर जी विकासाची कामे झाली आहेत यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे खूप सहकार्य लाभले आहे.

शनिवारी होत असणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर निर्णय जाहीर करू,अशी घोषणा आ. पिचड यांनी केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, विठ्ठलराव चासकर, जे. डी. आंबरे, ॲड. के. डी. धुमाळ, भाऊपाटील नवले, सुधाकर देशमुख, अशोक देशमुख, आशा पापळ, कल्पना सुरपुरिया, रामनाथ वाकचौरे, राजेंद्र डावरे, रमेश देशमुख, बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, संपत नाईकवाडी व आदी हजर होते.

दुसरीकडे आ. पिचड यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेताना जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी भाजप जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पं. स. सदस्य दत्ता देशमुख, अगस्ती साखर कारखाना माजी संचालक भाऊसाहेब वाकचौरे, तालुका उपाध्यक्ष गणेश पोखरकर, सुभाष वाकचौरे, प्रकाश कोरडे, सरचिटणीस मच्छद्रिं मंडलिक, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके हे उपस्थित होते.

याप्रसंगी आ. पिचड म्हणाले, अकोले तालुक्याच्या पुढील विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगले काम केले आहे. गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकूल योजना, उज्ज्वला गॅस योजना, महिलांसाठी शौचालय योजना राबविली.

ही खरी कामगिरी असून, जगात देशाचे नाव केले आहे. अकोले तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आहेत. फक्त आमदार राहून तालुक्यातील प्रश्न सुटत नसतील तर मग पद काय कामाचे, हा विचार केला. म्हणून फक्त तालुक्याच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेत आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठ्या मनाने प्रवेश देऊन स्वागत केले ही आनंदाची बाब आहे, असे मत आ. वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.

भाजपचे जि.प. गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले भाजप हा सर्वसमावेशक पक्ष आहे. त्यात आदिवासी समाजाचे राज्याचे नेते मधुकरराव पिचड हे पक्षात येतात ही पक्षाचे दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या पक्षात आम्ही आमदारकीचे स्वप्न आम्ही पाहिले. ते प्रत्यक्षात फुलताना पाहण्याचा आनंद होत आहे.

भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले आ. पिचड यांचा प्रवेश हा पक्षातील सुवर्णक्षरांनी लिहिला जाणारा क्षण आहे. त्यांचा प्रवेश हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उभारी मिळवून देणारा असून अकोले तालुका विकासात त्यांची साथ मिळणार आहे. यासाठी आम्ही सगळे त्यांना साथ देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, सरचिटणीस सुनील उगले, दलित आघाडी अध्यक्ष सुरेश पवार,सरचिटणीस सावळेराम गायकवाड, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कानवडे,वाल्मीक देशमुख, वाल्मीक नवले, अमोल कोटकर, सुनील पुंडे, ज्ञानेश पुंडे, शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष मच्छद्रिं वाकचौरे, सरचिटणीस नरेंद्र नवले, दिव्यांग सेल चे तालुकाध्यक्ष अमर मुरूमकर, मच्छद्रिं चौधरी, केशव बोडके, जालिंदर बोडके, राजेंद्र लहामंगे, संजय लोखंडे, सुशांत वाकचौरे, माधव ठुबे, सचिन दातीर, शुभम खर्डे, मदन आंबरे, अंकुश वैद्य, राहुल चव्हाण, राम रुद्र, शैलेश फटांगरे, प्रवीण सहाणे आदींनी यावेळी मते व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment