गणेशाची विविध रुपे साकारली कुर्ता, टी-शर्ट आणि ड्रेसवर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शुभाज फॅशन स्टुडिओमध्ये या गणेशोत्सवानिमित्त फॅ शनेबल आणि नाविण्यपूर्ण कुर्ते (नेहरु शर्ट) वर श्री गणेशाची विविध रुपे, आकार आणि श्‍लोक शुभदा डोळसे हीने साकारली आहेत. लंबोदर गणेशा असो वा कलात्मक अ‍ॅबस्ट्रक गणेश रुपे अतियश सुबकतेने या कपड्यांवर साकारलली दिसतात. गणपती स्तोत्रातील काही ओळी कलात्मकतेने या कपड्यांवर लिहून कॅलिग्राफीचा उत्तम नमुना या कला स्टुडिओत तयार होत आहे. 

शुभदा डोळसे हिने फॅशन क्षेत्रात आपल्या वेगळ्या कल्पक चित्रकल्पना विविध ड्रेसवर साकारल्या आहेत. गोकूळ अष्टमीला कृष्णाचे विविध आकार, शिवरात्रीला शिवाची आकर्षक रुपे, बाल हनुमान आदि प्रसंगानुरुप चित्रे विविध कपड्यांवर आकारात येतात. विविध अ‍ॅबस्ट्रॉक फॉर्म आपल्या डिझाईन केलेल्या जॅकेट, शूज, पर्स, बेल्ट आदिंवर सुंदरतेने रंगवित आहे.

पेंटींग केलेल्या हॅण्डमेड कलात्मक दागिण्यांची मोठी शृंखलाच शुभदा फॅशन स्टुडिओमध्ये पहायला मिळते. विविध साडयांवर विषयानुसार डिझाईन करुन देण्यात शुभदाचा हातखंडा आहे. मोरपीस, नथ, विविध श्‍लोक, मंत्रांचा कॅलीग्रॅफी साठी केलेला उत्तम उपयोग, मधूबनी, वारली सारख्या लोककलांची, विविध अक्षरांची साडीवर, दुपट्यावर केलेली आकर्षक रचना या स्टुडिओत पहावयास मिळतात.

अहमदनगरच्या विविध ऐतिहासिक वास्तूंची रेखाचित्रांच्या टी शर्टची सुंदर मालिका या स्टुडिओचे वैशिष्ट्ये आहे. भेट, वाढदिवस भेट म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणीचा फोटो त्यांच्याच टी-शर्ट वर रेखाचित्रातून शुभदा सुंदर बनवून देते. फॅमिली टी-शर्ट, ग्रुप टी-शर्ट, राखी पौर्णिमा, वाढदिवस, फ्रेडशिप डे आदि सारख्या विशिष्ट सण, उत्सवासाठी विशेष टी-शर्ट डिझाईन केल्या जातात.

लहान मुला-मुलींसाठी आवडीनुसार ड्रेस डिझाईन आणि पेंटींग हे या स्टुडिओत केली जात आहे. विविध चित्रपट, शॉर्ट फिल्म, जाहिराती, थीमनुसार ड्रेस डिझाईयर म्हणून शुभदाने काम केलेले असून, आपल्या ‘नॉन रिअलॅस्टिक मोड’ या अ‍ॅबस्ट्रॅक पेंटींगच्या ड्रेस डिझाईनचा वैयक्तिक फॅशन शो केलेला आहे.

विविध विषयानुसार ड्रेस डिझाईन त्यांचा कल्पकतेने फोटो शूट करणे हे शुभदा फॅशन स्टुडिओचे वेगळेपण आहे. गणराज, ब्रायडल, किन्नरी, गॅलक्सी, साउथ इंडियन, महाराष्ट्रीयन ब्रायडल लहेंगा, सूट आदि विषयावरील ड्रेस डिझाईन शुभदाने केलेले आहेत.

आधुनिकतेला परंपरेचा साज या स्टुडिओच्या ब्रीद वाक्यानुसार खण, इरकल, पैठणी इ. पारंपारिक कपड्यापासून आधुनिक फॅशनेबल वेस्टर्न स्टाईलच्या कपड्यांची डिझाईन हे या स्टुडिओचे वैशिष्टय आहे. स्टुडिओमार्फत जाहिरात, शॉर्टफिल्म, फोटोशूट आदिसाठी विविध ड्रेसेस भाडेतत्वावर देण्यात येतात. स्टुडिओ मार्फत लवकरच महाराष्ट्रीयन व आधुनिक कलेक्शन प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे शुभदाने सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment