मुंबई आणि मुंबई उपनगर व आजूबाजूच्या महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक मोठमोठे प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तसेच दुसरे म्हणजे मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता मोठमोठे उड्डाणपुले देखील उभारले जात असून वरळी बांद्रा सी लिंक सारखे प्रकल्प सध्या हाती घेण्यात आलेले आहेत.
तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या माध्यमातून देखील मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या पनवेल तसेच कर्जत सारखे महत्त्वाच्या शहरांना लोकलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी मिळते. यात आणखी सुधारणा करत अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण हार्बर मार्गावरील सीएसएमटी वरून पनवेल मार्गे कर्जत हा रूट पाहिला तर तो आता लवकरात लवकर गाठणे शक्य होणार आहे. कारण आता पनवेल ते कर्जत या नव्या उपनगरीय दुहेरी मार्गामुळे मुंबई येथून कर्जतसाठी आणखी लोकलचा एक मार्ग उपलब्ध होत आहे.
सध्या या प्रकल्पाचे काम सुरू असून डिसेंबर 2025 पर्यंत हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर बोगदा क्रमांक दोन वावर्ले हा 2625 मीटर लांबीचा असून हा बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे.
कसा आहे पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गीका प्रकल्प?
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गीका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील सर्वात अवघड काम म्हणजे सध्या या ठिकाणी बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर किरवली,वावर्ले आणि नढाल अशा तीन ठिकाणी बोगदे तयार केले जात असून त्यांची लांबी 3144 मीटर आहे.
त्यापैकी वावर्ले बोगदा हा 2625 मीटर लांबीचा असून जेव्हा या बोगद्याचे काम पूर्ण होईल तेव्हा मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील हा सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. तसेच यातील नढाल बोगदाचे खोदकाम साधारणपणे ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्यात आले होते व ते मे 2023 मध्ये पूर्ण देखील झाले आहे.
सिमेंट काँक्रिटी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्या खालो काल किरवली बोगदाचे काम 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आले व ते 30 मार्च 2024 रोजी पूर्ण करण्यात आले आहे. त्यासोबतच वावर्ले बोगद्याचे काम दोन एप्रिल 2024 पर्यंत 2425 मीटर इतके खोदकाम पूर्ण झालेले आहे व येत्या महिन्याभरात हे देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सध्या जर तुम्हाला मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथून कर्जत या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर धीम्या लोकलने कमीत कमी सव्वा दोन तास लागतात. तसेच मालगाड्या किंवा अपूऱ्या रेल्वे मार्गामुळे कर्जत गाठण्यात यापेक्षा जास्त वेळ लागतो.
तसेच हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल लोकलने जाण्याकरिता एक तास 20 मिनिटे लागतात. पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर मात्र हार्बर मार्गावरून सीएसएमटी- पनवेल- कर्जत लोकल प्रवास सा धारणपणे दोन तास 20 मिनिटात पूर्ण होईल.
तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये जर या हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल जलद लोकल सुरू झाली तर प्रवासाचा कालावधी यापेक्षा कमी होईल.