भाजी विक्रेत्याने चॉकलेटचं आमिष देऊन केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

Published on -

मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेतील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि 8 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे.

पीडित मुलगी खेळत असताना उमाशंकर गुप्ता (वय 43) नावाच्या भाजी विक्रेत्याने चॉकलेटचं आमिष देऊन तिला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.

जखमी मुलीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नराधम उमाशंकर गुप्ताला अटक करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe