अभिनेत्रीला केला व्हिडीओ कॉल अन केले हस्तमैथून आणि मग…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-मुंबईत एका तरुणाने बॉलिवूड अभिनेत्रीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत ऑनलाईन हस्तमैथून करुन अभिनेत्रीला त्रास देण्याची ही दुसरी घटना आहे.

आत्मसंरक्षण प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

अभिनेत्रीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दोन वेळा आपल्याला त्या क्रमांकावरुन फोन आला असता कट केला होता. युकेचा कोड असणाऱ्या या क्रमांकावरुन तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा आपण चुकून तो स्वीकारला.

यावेळी समोरील व्यक्ती हस्तमैथून करत होती. आपल्याला खूप मोठा धक्का बसला, मी त्याचे स्क्रिनशॉट घेतले आहेत. दरम्यान अभिनेत्रीचा त्रागा आणि आपण अडचणीत आल्याचं लक्षात येताच अज्ञात व्यक्तीने माफी मागत आपण २० वर्षीय विद्यार्थी असून चूक झाल्याचं म्हटलं.

एवढेच नाही तर आरोपीने आपले मेसेज आणि व्हिडीओ कॉल एका मैत्रीणीसाठी होते, तिचा फोन क्रमांकही सारखाच असल्याचा दावा केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

मुंबईत एका स्क्रिप्टरायटरला एका तरुणाने व्हिडीओ कॉलवरच हस्तमैथून केले होते. त्याबाबत खार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना जुलै 2019 मध्ये घडली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment