प्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही

Published on -

अहमदनगर : बाळासाहेब विखे आणि पवार यांचे वैर नव्हते. अलीकडे राजकारणासाठी त्यांच्यातील वादाचा गवगवा केला जात आहे. प्र‌वरा परिसरात या विखे कुटुंबियांची हिटलरशाही चालते. 

त्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यांनी सख्या भावाला एवढा त्रास दिला आहे, तर इतरांची काय व्यथा, अशी टीका डॉ. अशोक विखे यांनी केली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यामध्ये डॉ. अशोक विखे यांचे भाषण झाले. 

वडिलांचे आजारपण, अंत्यविधी, डॉ. विखे यांची वैद्यकीय पदवी अशा अनेक गोष्टींसंबंधी त्यांनी अनेक अरोप केले. ते म्हणाले,

बाळासाहेब विखे आजारी असताना त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी डॉ. सुजय यांनी पाच डॉक्टरांनी दिलेला सल्ला डावलून त्यांना तशा अवस्थेत लोणीत आणण्याचा निर्णय घेतला. 

या तिघांसाठी जवळ जायचे असले तरी हेलिकॉप्टर वापरतात. मात्र, बाळासाहेबांना त्रास देण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिकेतून आणले.

मोठा भाऊ म्हणून वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा आपला अधिकार होता. मात्र राधाकृष्ण यांनी तो हिरावून घेतला.

यासाठी गावातील ब्राम्हण तयार नव्हते म्हणून पुणतांब्याहून आणले. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या ताब्यातील संस्था काढून घेतल्या. त्यासाठी कोर्टात वडिलांच्या सह्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले होते.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe