अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
भाजप ने इतर पक्षातील अनेक नेत्यांना पक्षात स्थान दिले होते. मात्र अशा प्रकारच्या उमेदवारांना आयात केल्यामुळेच पक्षाचे नुकसान झाले असल्याची खंत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केली आहे.
विखे आल्यामुळेच जिल्हयात भाजपचे नुकसान झाले असल्याचा आरोप केला आहे, आज शुक्रवारी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भाजपची महत्वाची बठक पार पडती.
यावेळी नगर जिल्ह्यातील सर्व नाराज आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तत्पूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवाजी कर्डीले यांनी भाजपमध्ये येऊन आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उघडपणे आरोप केले आहेत.
विखे पाटील भाजपमध्ये आल्याने पक्षाचे नुकसान झाले असे म्हणत या आधी पक्षाकडे अहमदनगरमध्ये पाच आमदार होते तर आयारामाना स्थान दिल्यानंतर तीनच आमदार निवडून आले
आणि त्यातील दोन आमदार हे तर अगदी काठावर निवडून आल्याचे स्पष्ट मत शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केले आहे.
यावेळो माजी मंत्री राम शिंदे यांनीही विखे यांना घेऊन पक्षाचा काहीच फायदा झाली नाही उलट तोटाच झाला असल्याचे आज मुंबईत फडणवीस यांना सांगितले.
यासह माजी आमदारांनी विखे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्यानंतर माजी मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी बैठक सोडल्याचे बोलले जाते.