अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सहकारी बँकेसाठी सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून संस्थेचे संचालक, माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांचा केलेला ठराव रद्द करण्यात आला आहे.
या निर्णयाने खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह भाजपला राजकीयदृष्ट्या धक्का बसला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर यांनी याबाबत आदेश केले आहेत.
काष्टी सोसायटीचे माजी अध्यक्ष कैलास पाचपुते यांनी भगवानराव पाचपुते यांच्या ठरावावर हरकत घेत हा ठराव नियमबाह्य पद्धतीने केल्याने रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीस काष्टी सोसायटीच्या वतीने कोणीही हजर राहिले नाही.
कैलास पाचपुते यांनी दाखल केलेल्या हरकती मध्ये जी संस्था बँक पातळीवर थकबाकीत आहे त्या संस्थेच्या कुठल्याही संचालकाला स्वतःच्या नावे संस्थेचा प्रतिनिधी म्हणून ठराव घेता येत नाही.
तथापि काष्टी सोसायटी थकबाकीत असतानाही व भगवानराव पाचपुते सोसायटीचे विद्यमान संचालक असतानाही त्यांनी त्यांच्या नावे बँक निवडणुकीसाठी ठराव केला. भगवानराव पाचपुते यांनी ४ मार्च रोजी झालेल्या संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भसग घेतल्याचा पुरावा कैलास पाचपुते यांनी हरकती सोबत जोडला होता.
सदर ठराव नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची मागणी कैलास पाचपुते यांनी केली होती. ही मागणी मान्य करीत डॉ. लाठकर यांनी काष्टी सोसायटीच्या वतीने केलेला ठराव रद्द करतानाच जिल्हा बँक मतदार यादीतून काष्टी सोसायटीचे नाव वगळण्याचा आदेश केला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com