थोरातांच्या तालुक्यात विखे पाटलांकडून विकासकामांसाठी १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर!

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- तालुक्यातील १६ गावांमधील मूलभूत सुविधांकरिता युती सरकारच्या माध्यमातून १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

सावरगाव तळ, मालुंजे, निमोण, अंभोरे, चंदनापुरी, जोर्वे, मनोली, शिबलापूर, आश्वी खुर्द व बुद्रूक, ओझर खुर्द, कोल्हेवाडी, चिंचपूर, पिंपरी लौकी, उंबरी बाळापूर या गावांचा यात समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला होता.

विखे यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभागात या निधीसाठी पाठपुरावा केला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रस्तावांना निधी उपलब्धतेसाठी हिरवा कंदील दाखवला. सावरगावतळ येथील सभागृहाचे सुशोभीकरण करण्यासाठी २० लाख, मालुंजे गावठाण ते काकड वस्ती रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख, निमोण बाजारतळावर पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी २० लाख,

येथील साईबाबा मंदिर व मारुती मंदिराची संरक्षक भिंत, तसेच पेव्हर ब्लॉकसाठी २० लाख, चंदनापुरी येथे साईबाबा मंदिर परिसरात सभागृह तसेच सुशोभीकरणासाठी १७ लाख, जोर्वे येथे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी १० लाख, मनोली येथे लक्ष्मीमाता मंदिराजवळ सभागृह बांधण्यासाठी ५ लाख, तसेच शिबलापूर येथील भैरवनाथ मंदिरासाठी संरक्षक भिंत आणि सुशोभीकरणासाठी २० लाख मिळतील.

आश्वी खुर्द येथील स्वातंत्र्य चौक ते मज्जीत ओढा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध होणार असून आश्वी येथील पेशवेकालीन गणेश मंदिराजवळ सभागृहासाठी १५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली. ओझर खुर्द येथील मनोली उंबरी रस्ता ते ओझर खुर्द रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आणि आश्वी बुद्रूक येथील महालक्ष्मी मंदिराजवळ सभागृहासाठी अनुक्रमे ७ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment