विनायक मेटेंचा राजीनामा

Published on -

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा करायचा ठरल्यास, त्याची उंची 153 मीटर करण्याचा विचार आहे.

सरदार पटेलांच्या 152 मीटरच्या पुतळ्यापेक्षा एक मीटरने उंच पुतळा शिवरायांचा करण्याचा विचार असून, सध्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाचा पुतळ्याची उंची 123.2 मीटर, तर चबुतरा 88.8 मीटर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe