शालेय तरुणीचा विनभंग करून भावाला कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी

Ahmednagarlive24
Published:

राहुरी – एका शालेय तरूणीस मोटारसायकलवर पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी येथे शिक्षण घेत असलेली २० वर्षीय तरूणी घरी जात असताना गोट्या उर्फ राहुल पवार रा. चाकण, जि. पुणे ह. मु. धामोरी, ता. राहुरी हा वरवंडी फाटा ते वरवंडी या दरम्यान मोटारसायकलवरून येवून तरूणीस लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य करून तू मला फार आवडते. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तरूणीस घरातून घेवून जाण्याची धमकी दिली.

सदरील प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी त्याच तरूणाने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास तरूणीच्या भावास फोनवरून शिवीगाळ करून तू पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर कोयत्याने तोडून टाकीन अशी धमकी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment