‘येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल’ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-मनसेने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची तुलना विरप्पन गँगशी केली आहे.

‘विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,’ असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

दरम्यान मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आज मनसेची महत्त्वाची बैठक मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये होणार आहे.

या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे.

विरप्पन ने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment