Tourist Places: ऑक्टोबर महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ‘या’ पर्यटन स्थळांना कुटुंब किंवा मित्रांसोबत दया भेट! जीवनामध्ये व्हाल रिफ्रेश

निसर्गाने खूप समृद्ध असून निसर्गाची मुक्त उधळण अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीने तुम्हाला जर ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठे ट्रीप प्लान करायची असेल तर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याची निवड करू शकतात.

Ajay Patil
Published:
lonar sarovar

Tourist Places:- आपल्यापैकी बरेच जण मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जायचं प्लॅन करतात.दररोजच्या धावपळीच्या जीवनशैली पासून आणि त्याच त्याच रुटीन पासून काहीतरी निवांत वेळ मिळावा व निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमता यावे या करिता निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा बेत आखला जातो.

अशा निसर्ग समृद्धाने नटलेले अनेक ठिकाणे महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्र त्या बाबतीत खूप समृद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला अनेक छोटे-मोठे पर्यटन स्थळे सापडतील.

निसर्गाने खूप समृद्ध असून निसर्गाची मुक्त उधळण अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीने तुम्हाला जर ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठे ट्रीप प्लान करायची असेल तर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याची निवड करू शकतात.

या जिल्ह्यामध्ये अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेतच व त्यासोबतच धार्मिक पर्यटन स्थळे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. या जिल्ह्याला भेट देण्यासाठी तुम्ही ऑक्टोबरच नाही तर नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत कधीही जाऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊ.

 ही आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे

1- अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा शहरातील हे अभयारण्य सर्वात सुंदर असे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून या अभयारण्याला भेट देण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. या ठिकाणी निसर्गाने समृद्ध तर आहेतच परंतु तुम्ही वाघ तसेच सिंह चित्ता जंगलामध्ये राहणारे इतर अनेक प्राणी पाहू शकतात. आंबा बरवा अभयारण्य बुलढाणा शहरापासून 125 किलोमीटर अंतरावर आहे.

2- गजानन महाराजांचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले शेगाव हे गजानन महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून संपूर्ण जगात धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात.

या मंदिरात दर्शनासाठी गेला तर तुम्हाला निरव अशा शांततेचा अनुभव या ठिकाणी येतो व मनाला देखील खूप प्रसन्न असे वाटते. त्यामुळे तुम्ही बुलढाणा जिल्ह्याची सैर करत असाल तर गजानन महाराज मंदिराला अवश्य भेट देणे गरजेचे आहे.

3- आनंद सागर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी हे एक उत्तम असे पर्यटन स्थळ असून निसर्गप्रेमींचे हे एक आवडते असे ठिकाण आहे. तुम्ही जर आनंद सागर ला भेट दिली तर या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण मनाला शांतता तर देतेच परंतु दररोजच्या कोलाहालापासून तुम्हाला काही कालावधी करिता मुक्तता मिळते.

4- लोणार सरोवर लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. लोणार सरोवर पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातूनच नाहीतर संपूर्ण भारतातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. लोणार सरोवर हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ असून उत्तम पर्यटना करीता हे एक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

5- राजुर घाट राजुर घाट बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवर असून पर्यटकांना या घाटामध्ये अनेक मंदिरे तसेच नद्या, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. निसर्गाचा सुंदर आविष्कार आपल्याला राजुर घाटामध्ये पाहता येतो.

या घाटात व्यंकट गिरी बालाजी आणि हनुमानाचे मंदिर देखील असून त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. तसेच राजुर घाटाचे नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणावर असल्याने देखील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe