राज्यात ठिकठिकाणी मतदानाला सुरुवात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

पण कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

त्यानुसार आज राज्यभरातील जवळपास 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी गावागावात मतदान केंद्र सजली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक गाड्या आता गावात दाखल होऊ लागल्या आहेत.

तसंच वयस्कर मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे. दरम्यान आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक गावात उमेदवारांनी मतदान यंत्राची पूजा करुन, मतदानाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिशानिर्देश दिले आहेत.

त्यानुसार मतदान केंद्रांवर सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी जाताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment